अतिशय खुपते पण बहुसंख्य मराठी मंडळी मुर्दाड मनाने हे सर्व खपवून घेतात आणि वर आपण हा विषय काढल्यास, " छोड ना, यार, बोअर करू नकोस, समजणे इंपॉर्टंट आहे" ह्या त्रिभाषिक वाक्यात मुद्दा निकालात काढतात. मराठीची वैशिष्ट्यपूर्ण लय व वाक्यरचना आहे व ती हिंदी व इंग्रजीहून वेगळी आहे हे दूरचित्रवाणी मालिकांवर पोसलेल्या बहुतेकांच्या गावीही नाही.