मन्जुशा....!!!!लेख आवडल्याचे कळवल्याबद्दल खुप धन्यवाद...!!!"चकास"विषयी सांगायचे तर हा एक बैठा खेळ आहे. कुणीपण खेळू शकतो.या खेळाला तुम्ही काय म्हणतात, याची कल्पना नाही. फरशीवर किंवा पाट्यावर पाच आडवे-उभे रेघा मारल्या की, चौकोनी रकाने तयार होतात.एकावेळी चौघं खेळू शकतात.आपल्या दिशेच्या मधल्या रकान्यात खडे किंवा मणी चार-चार ठेवायचे.मग चार कवड्या असतात. त्या उधळायच्या. बाजू मोजायची नि चाल खेळायची. तितके घर जायचं. खेळत-खेळत जो आधी आतल्या मधल्या रकान्यात आपले चार मणी आणेल. तो हा डाव जिंकतो. बाकी गडी हरतात. असा हा खेळ..!!! लहानपणी खुप खेळली आहे. -आता या खेळाविषयी केलेला खुलासा आवडला असेल. मला परत त्या दुनियेची फेरी करवून आणून आंबट-गोड आठवणी जागवल्याबद्दल तुमचेच धन्यवाद मी मानते.

अच्छा... बाय....

****आबीछाया****