-- ह्याला जबाबदार पण आपणंच आहोत, आपल्यालाच ह्या सवयी लागल्या आहेत.
१. आम्ही सगळे कुटुंबीय दिवाळीसाठी एकत्र जमलो होतो तेव्हा आम्ही एक खेळ खेळला होता की आपण आता ज्या गप्पा मारत आहोत त्या मरताना पुढील एक तास कोणी इंग्रजी / हिंदी शब्द वापरायचे नाही आणि चुकून वापरला गेलाच तर मग त्याला काहीतरी शिक्षा. --> तेव्हा लक्षात आलं की आपलं एकही वाक्य हे इंग्रजी / हिंदी शब्द वापरल्या शिवाय पूर्णं होत नाही. मग तेव्हाच ठरवलं की आपण आपल्या घरापासून ह्याची सुरुवात करायची
२. तेव्हा अजून एक मुद्दा लक्षात आला की अस बोलण्याने सगळे या चर्चेमध्ये सामील होवू शकतात. सगळे म्हणजे घरातील ज्येष्ठ व्यक्ति, किंवा लहान मुलं. बऱ्याचा वेळेला अस होत की आपण खूप तांत्रिक / ऑफिसमध्ये वापरले जाणारे इंग्रजी / हिंदी शब्द सर्रास मराठी मध्ये वापरतो, पण त्या शब्दांचा अर्थ न समजल्या मुळे घरातील ज्येष्ठ व्यक्ती, किंवा लहान मुलं यांना काहीतरी गैर-समज होतो, आणि ते चर्चेमध्ये सामील होत नाहीत.
आधी आपण घरापासून सुरुवात करू आणि मग आपोआप त्याचा दूरगामी परिणाम होईलच.
आपल्याला मनोगत ने सुद्धा या साठी मदतच केली आहे, कारण आपण इथे लिहिताना १०% जास्त इंग्रजी शब्द वापरू शकत नाही.... हाही एक उपाय आहे ह्यातून बाहेर पडण्याचा. धन्यवाद मनोगत !!
असच वेगवेगळ्या माध्यमातून आपण जनजागृती करू शकतो.