माझ्या प्रश्नाने गैरसमज करून घेऊ नका. खरंतर मी हा प्रश्न कुतूहलापोटी विचारला.
तुम्ही जे वर्णन केलेत त्यावरून ही एका खेडेगावातली तसेच जुन्या काळातली घटना वाटते. म्हणून कौतुक वाटले.
तरीही अज्जाबाबा म्हणजे नक्की कोण हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला, कारण अज्जाबाबा हा शब्द माझ्यासाठी नवीन आहे. अर्थात आजोबांना (आईच्या वडिलांना) असे संबोधायला हरकत नाही.
माझेही आजोबा आमच्या कुळधर्माच्या दिवशी सोवळ्यात देवपूजा आणि पुरणाचा सगळा स्वयंपाक करायचे. आजीला त्या दिवशी सगळ्या कामाला सुट्टी मिळायची. आणि ही स्वातंत्र्यपूर्व काळातली घटना आहे.
बाकी आपले लिखाण उत्तम आहे. चित्र अगदी जसेच्यातसे डोळ्यासमोर उभे केलेत. मलाही त्या काळात नेऊन सगळ्या आठवणी ताज्या केल्यात त्याबद्दल धन्यवाद.