आखूप खूप खूप छान वाटले वाचून. आबीछाया - तुमची लेखनशैली अप्रतिम आहे.
माझ्या आजीची आठवण झाली. आजीने शिकवला होता हा खेळ आम्हाला. माझी आजी म्हणजे माझ्या वडिलांची काकू आणि शिक्षिका म्हणून ते तिला बाई म्हणायचे, आणि ती आमची आजी म्हणून आम्ही तिला बाईआजी म्हणायचो.
आम्ही ह्याला काचा-कवड्या म्हणतो, खूप मजा यायची खेळताना आणि माझी आजी आमच्या बरोबर लहान मुलं होऊन खेळायची. ३/४ तास छान रंगाचा हा खेळ. खेळताना सगळ्यानीं वेगवेगळ्या रंगाच्या बागडिच्या काचा घ्यायच्य म्हणजे कोण कुढल्या घरात आहे ते पटकन समजायचे, ४ कवड्या घ्यायच्या आणि कवड्या नसतील तर सरळ २ चिंचोके ध्यायचे, चिंचोक्याला त्याला उभ घरून खलबत्याचा एक घाव घालायचा, म्हणजे एकुण ४ कवड्या सारखे फासे मिळाले, हतात घोळवून जमिनीवर टाकायचे सगळे उताणे पडले आणि सगळ्याच्या पांढर्या बाजू वर आल्या तर ४ मिळाले, म्हणजे ४ घर पुढे जायचे....
दुख्खई, चौखई, माझं घरं, तुरुंग.... हे ह्या खेळात वापरले जाणारे शब्द होते.
वा!! मजा आली आबीछाया, धन्यवाद. खेळ आणि त्याबरोबरच्या आठवणी डोळ्यासमोर आल्या आणि जणू आठवणींचा ५ मिनिटांचा सिनेमा (कृष्णधवल... ) पहिला अस वाटत आहे.
धन्यवाद !!