१. जेव्हा २०-२० क्रिकेटचे सामने आले तेव्हा सगळ्यांना असच वाटलं होत की हा काही क्रिकेट नाही, लोकांना आवडणार नाही पण आज आपण पाहतो आहोत की हे सामने किती प्रसिद्ध झाले आहेत. कारण आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये लोकांकडे वेळच नाही. त्यामिळे कदाचित वाचकवर्ग कादंबरी पासून दूर गेला असेल.
२. कादंबरी म्हणजे लेखकाने त्याच्या कल्पनाशक्ती वरून रचेलेला सिनेमाच आहे, लेखक आपल्याला त्या जगात घेऊन जातो आणि एक-एक पाकळी/पान उलगडत जातो... आजकाल एवढं वाचन करून मग त्या कल्पनाशक्तीच्या जाळ्यात अडकून गुंग करून घेण्यासाठी वेळ आणि त्याची आवड कोणाकडे आहे, त्यापेक्षा Internet वर सहज उपलब्ध होणाऱ्या video Clips, Pictures जास्त आर्कषित करतात, हे सगळं म्हणजे ready to enjoy असं असतं.
३. ज्या लोकांना वाचनांची आवड आहे त्यांना मात्र काही आडवं येत नाही मग ती कादंबरी असो की १००० पानाचा खंड. असो, फक्त वाचनाची आवड हवी बस!!
४. लेखकाची लेखनशैली जर अप्रतिम, खेळवून ठेवणारी असेल (प्रत्येकाची कल या मध्ये वेगळा असू शकतो) तर मग त्या लेखकाने कादंबरी लिहिली असो की १००० पानाचा खंड वाचकवर्ग हा लाभणारंच. आपल्या मनोगतावरच अस होत की काही लेख हे भले मोठे असतात, पण आपल्याला तो लेखक / लेख इतका आवडतो की आपण अगदी वेळ कढून लेख वाचतो, आज वेळ नसेल तर खूण करून ठेवतो आणि नंतर वाचतो, बरोबर ना???