नाही माझा कसलापण गैरसमज झाला नाही.जर लेखासंबधी काही कुतूहलापोटी विचारलंय ना...!!!! मग जो लिहतो त्याची ती सेवाच आहे की,आपल्या वाचकाचे आनंदानी उत्तर देणे.माझी आई जीला मी आबी म्हणते तिचे ते बाबा...!!!! मी फक्त आधी 'अज्ज्या'लावला.अजूनही इकडे 'आजोबा'हा शुद्ध नागरी शब्द वापरतच नाहीत. बोलीभाषेतला हा मोकळाढाकळा निखळ आनंद मनाला देणारा.हा गावाची आठवण मनात दरवळत ठेवणारा,हा शब्द आहे.

जुन्याच काळातले अज्ज्याबाबा होते.माझा जन्म पण झाला नव्हता त्या स्वातंत्र्यपूर्वीच्या काळ अज्ज्यानी पाहीलेला.अगदी डोळ्यासमोर वाड्याच्या उंबरठ्याशी माणसांच्या कत्तली पाहील्यत.अज्ज्या किंवा आबी मला आठवणी सांगायचे तर अंगावर शहारे उभे राहायचे.

अज्ज्याबाबा मायाळूच होती. घरकामाची-टापटीपीची आवडच होती. म्हणून आजी मग वरची सारी कामं उरकायची. अश्या व्यक्ती खरं तर दुर्मिळच.....!!!!! नि हे माझे होते याचा मला कायम अभिमानच राहील.

माझे लिखान आपल्याला आवडले हे असं मनापासून कळवल्याबद्दल अनेक धन्यवाद....!!!! यापुढल्या माझ्या लेखनाचे असेच मनापासून स्वागत करावे.तसं फार अनियमीत आहे माझं लेखन....!!!!! पण काही ना काहीतरी खरडण्याचा आस्वाद मी घेते. नि देते.ही माझी खुशी.....!!!!!!त्यानिमीत्तानी का होईना पण एका छानश्या दुनियेची सफर वाचकाला घडवून आणली. नि माझ्या खरडण्याचं सार्थक झालं...!!! असो....!!!!

-आबीछाया-