अनुराधा...!!!
आपण लेख वाचून जो मनमोकळा संवाद साधला त्याबद्दल आभारी आहे.लेखनशैली आवडली हे वाचून पण खूपच बरे वाटले. माझी एक खूप जिवाभावाची सखी आहे. त्यामुळे माझी लेखनाची ढक्कलगाडी सुरू आहे. माझ्या लेखनाचं श्रेय माझी सखी काही स्विकारत नाही.पण खरं तिचंच हे श्रेय....!!!!
मी पण काही अनियमीत लेखन करते. त्यावेळी अशीच त्या दुनियेत मी हरवून जाते.त्या आठवणीच्या दुनियेत रमून जाते. त्यातून बाहेर या कमर्शियल जगात येऊच नये असं वाटतं. पण करणार काय ना, या जगाशी पाला जो पडलाय. पोटापाण्यासाठी या दुनियेत पाऊल टाकावंच लागतं. पण अश्या रुक्ष जगापासून जरावेळ सुटका आठवणीच्या फेरफटक्यातून मारून आलं. की मना-मनाचं ओझं पेलण्याची एक अनामिक अद्दश्य शक्ती बहाल होते. इतकं तर आपल्या हाती नक्कीच आहे नाही,का....!!!!
खेळासंबधी माझा विसर पडलेल्या शब्दांचा खजिनाच आणून. माझ्यासमोर तुम्ही ओतलात. त्याबद्दल मलाच तुम्ही खुशीची दुनिया बहाल केलीत. निखळ आनंद दिलात. त्याबद्दल तुम्हाला खूप-खूप धन्यवाद....!!!!!
तुन्हाला जसं हा ५ मिनिटाचा हा मराठी ब्लॅक-व्हाइट सिनेमा या खेळाचा जाणवला. तसंच अगदी मला पण यातून नवे शब्द तुमच्याकडून घेऊन. मी पण त्या दुनियेतून फेरफटका मारून आले. त्याबद्दल पण धन्यवाद....!!!! नी असेच माझ्या लेखनाचे स्वागत असू द्यावे.
परत एकदा धन्यवाद.....!!!!!!
-आबीछाया-