श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या संबंधी त्यांचा कुलवृतांत आणि जन्म असा विषय या ब्लॉग मध्ये आहे.
भगवंत सांगतात " शुभ कार्यात अर्थात कल्याणकारी काम करणाऱ्या मनुष्याचा विनाश या लोकी होत नाही आणि परलोकीही होत नाही. असा मनुष्य दुर्गतीला जात नाही. " ( गीता अ. ६/४० )
या श्लोकात दिलेले भगवंताचे आश्वासन, कोणत्याही साधनाने का होईना, शुद्ध अंत:करणातून परमात्मप्राप्तीची इच्छा असणाऱ्या सर्व साधकांना दिलासा देणारे आहे
श्रीमहाराजांचा जन्म पुण्यवान परंपरा लाभलेल्या भगवतप्रेमी परमपवित्र ब्राह्मणवंशी झाला.श्रीमहाराजांनी भगवन्नामस्मरणात उभे आयुष्य वेचले. केवळ मोक्षप्राप्ती हे आत्मकेंद्रित संकुचित ध्येय न ठेवता इतरांनाही त्यांचा उद्धार व्हावा यासाठी भगवन्नामाची दीक्षा दिली. असा जन्म केवळ दुर्लभच नव्हे तर अगम्य, अमोघ आहे.
क्रमश: प्रसिद्ध होणारा खालील ब्लॉग जरूर वाचवत अशी शिफारस करीत आहे.
chaitanyasprash.blogspot.com .