भाषांतरित वाटणारी मराठी कानाला खुपते. 

मला असा अनुभव आहे की दरवर्षी भारतात गेल्यावर थोडी वेगळी मराठी कानावर पडते. हल्ली माझी तरूण - धाकटी मामे-मावस भावंडं तर माझ्या मराठीतच काहीतरी 'झोल' आहे असे मला पटवून देतात. 

इतकी वर्षे इंग्लंडात राहूनही मी अजून मराठीतून इंग्रजीत भाषांतर करत असते मनातल्या मनात. त्यामुळे अनेक नवे आणि विनोदी वाक्प्रयोग होतात. त्यातले काही काही आता माझ्या सहकाऱ्यांनीही वापरायला सुरुवात केली आहे. जुन्या नोकरीतली एक सहकारी अजूनही 'बाप्रे' हा शब्दप्रयोग वापरते. उदा.दिस इज़ अ टोटल बाप्रे केस. 

एकंदरित वापरातल्या इतर भाषांचा मराठीवर परिणाम होणे साहजिक आहे असे मला वाटते. परिणामाचा वेग बेताचा असावा इतकीच आशा.