कधी तरी एकलेपणाचे
भाग्य फळफळावे
मला साथ लाभावी
तिला साथ लाभावी ।
कधी तरी मनाचे
भाग्य फळफळावे
मला प्रेम लाभावे
तिला प्रेम लाभावे ।
कधी तरी उंबऱ्याचे
भाग्य फळफळावे
मला तिने वरावे
मी तिला वरावे ।
कधी तरी शांतीचे
भाग्य फळफळावे
तिला माझे पटावे
मला तिचे पटावे ।
कधी तरी घराचे
भाग्य फळफळावे
मी बाबा बनावे
तिने आई बनावे ।
कधी तरी संसाराने
गझल सुरेख व्हावे
तिला सुख लाभावे
आम्ही सुखी असावे ॥
कधी तरी गझलेचे
भाग्य फळफळावे
मी एक चरण व्हावे
दुसरे तूं शोभावे ॥