एम. डी. रामटेके. येथे हे वाचायला मिळाले:
याच दरम्यान बाबासाहेब मुंबईत बसुन परत वकिलीचा अर्धवट सोडलेला अभ्यासक्रम कसा पुर्ण करता येईला याच्या विचारात होते. नोकरी मिळने तर कठिण काम होते. त्यांचा अमेरीकेतील शिक्षणात सोबत असलेला मित्र नवल भथेना यानी दोन शिकविण्या मिळवुन दिल्या. किती हा संघर्ष बघा. अमेरीकतुन शिक्षण घेऊन आलेल्या उच्च विद्याविभुषीत माणसाला शिकवणी घेऊन जगावे लागत होते. याच दरम्यान बाबासाहेबनी “स्टॉक्स आणि शेअर्स” संबंधी लोकाना सल्लादेणार कंपनी काढली. बाबासाहेबांचा अभ्यास इतका सखोल होता की त्यांच्या मार्गदर्शनामुळे लोकाना फायदा होऊ लागला. ...