'तू असं काही करणार नाहीस! ' हे वाक्य कृत्रिम वाटले तरी चुकीचे नसावे. तूऐवजी तो वापरून, 'तो असे काही करणार नाही, (असे माझी मनोदेवता मला सांगते)' हे वाक्य वाचावे. काही त्रुटी जाणवते? मग, तू असे काही करणार नाही आहेस, (अशी मला खात्री आहे.) यातला पूर्वार्ध चुकीचा का वाटतो? तू करणार आहेस, तू असे करणार आहेस, तू असे काही करणार आहेस, तू असे काही करणार नाहीस ही वाक्ये सकृद्दर्शनी बरोबर वाटतात. 'असे'चे स्पष्टीकरण नाही एवढीच चूक असेल तर असावी.
तू असे काही करणार नाहीस-- साधा भविष्यकाळ. तू असं काही करायचं नाहीस/करू नकोस. - आज्ञार्थ. करू नयेस.--विध्यर्थ.
तुला मी असं काही करू देणार नाही. कर्ता बदलून, साधा भविष्यकाळ. तीनही वाक्ये नकारार्थी!
यावर जास्त चर्चा होण्याची गरज आहे, असे वाटते.