मराठीव्यतिरिक्त अन्य कोणतीही भाषा अशी सररास बोलीरूपात लिहिली जात असेल, असे मला वाटत नाही.

मराठीव्यतिरिक्त अन्य भाषांमध्ये लेखी आणि बोली अशी भिन्न रूपे असण्याबद्दल विशेष कल्पना नाही.

(नाही म्हणायला, बंगालीत 'साधुभाषा' आणि 'चलितभाषा' असे दोन प्रकार आहेत खरे, पण 'साधुभाषे'त जुन्या काळातील बंगाली लेखक वगळल्यास आजमितीस कोणी लिहीत असेल, असे वाटत नाही. 'चलितभाषा' ही खरे तर सर्वसामान्यांची 'प्रमाण' बोलीभाषा धरायला हरकत नाही,परंतु आजकाल जवळपास सर्व लेखन या 'चलितभाषे'त होत असावे. 'साधुभाषे'तली आणि 'चलितभाषे'तली अनेक रूपे वेगवेगळी होतात, आणि बऱ्याच अंशी हे फरक मराठीतल्या 'ठरविले' विरुद्ध 'ठरवले' किंवा 'करावयाचे' विरुद्ध 'करायचे' अशा प्रकारच्या फरकांसारखे वाटतात. (चूभूद्याघ्या.)

उदाहरणे द्यायची झाल्यास, 'कलिकाता' (उच्चारी: 'कोलिकाता') हे साधु, तर 'कलकाता' (उच्चारी 'कोलकाता') हे चलित. 'ताहा हइले' (उच्चारी: 'ताहा होइले', अर्थ: 'तसे झाल्यास') हे साधु, तर 'ता हले' (उच्चारीः 'ता  होले') हे चलित. किंवा '(आमि) करिलाम' (उच्चारीः '(आमि) कोरिलाम', अर्थ: 'मी केले') हे साधु, तर 'आमि करलाम' (उच्चारी: '(आमि) कोरलाम') हे चलित.)