बाळ ठाकरे हिंदुत्वाला फ़सले आणी त्यांच्या कारकीर्दीला उतरती कळा लागली. दरम्यानच्या काळात आपली मुंबईची मराठी व्होट बँक वाचवण्याचा प्रयत्नही शिवसेनेने केला नाही. उत्तर भारतीयांचे मेळावे करण्यात वेळ आणी ताकद खर्ची घातली. पुढे ते साथ देत नाहीत हे लक्षात आल्यावर पुन्हा मराठी कार्ड ! पण दरम्यान, गिरणगवातला मराठी वर्ग़ हळुहळु शिवसेनेपासून दूर जाऊ लागला. ५ वर्ष सत्तेत राहूनही गिरणी कामगारांची केलेली घोर निराशा आणी मुंबईत कमी होत चाललेला मराठी टक्का ह्याची सेनेला दखल घ्यावीशी वाटली नाही. आपली व्होट बँक संपते आहे हे ही ज्या पक्षाला लक्षात येत नाही, तो पक्ष कसा बरं टिकेल ? ठाकरेनंतर, थोडे भाजपमध्ये, थोडे राष्ट्रवादी मध्ये, उरतील ते खरे शिवसैनिक, ज्यांना विचारणार कुणीही नसेल !

मयुरेश वैद्य.