असे सर्व भाषांमध्ये होत असते. काही वाक्यांत व्याकरणाच्या दृष्टिकोणातून व नियमांनुसार काहीच  चूक  नसते.  तरीही  ती  कुठेतरी  खटकतात.  त्यांची  रचना  एक  तर  कृत्रिम,  किंवा  ओबडधोबड  वाटते. ह्याला कारण हे असावे की ती वाक्ये त्या भाषेच्या मूळ प्रकृतीला, लयीला  अनुसरून  नसतात.