ही चर्चा समोरासमोर होऊ शकली असती तर माझा मुद्दा मला जास्त चांगल्या रीतीने मांडता आला असता. असो.
'तू असं काही करणार नाहीस! ' ह्या वाक्यात व्याकरणदृष्ट्या शोधूनही चूक सापडणार नाही. त्यात व्याकरणाची चूक आहे असे मी म्हटलेही नाही. पण दूरचित्रवाणीवर अनेक वेळा असे वाक्य ज्या संदर्भात उच्चारले जाते त्या ठिकाणी ते कृत्रिम, इंग्रजीचे शब्दशः भाषांतर वाटते. आता मला एखादे विशिष्ट उदाहरण आठवत नाही पण मी एक काल्पनिक उदाहरण देत आहे.
समजा एखाद्या हुशार, होतकरू मुलाने घरातील आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण सोडून नोकरी धरण्याचा निर्णय घेतला आहे. अशा वेळी आई त्याला प्रेमाने, अधिकारवाणीने आणि ठामपणे सांगते, "तू असं काही करू नकोस. " तिला असे म्हणायचे असते की पैशाची काळजी करू नकोस, तुझं शिक्षण जास्त महत्त्वाचं. अशा संदर्भात बऱ्याच वेळा "तू असं काही करणार नाहीस. " हे वाक्य उच्चारले जाते आणि ते मला कृत्रिम वाटते.