समजा एखाद्या हुशार, होतकरू मुलाने घरातील आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण सोडून नोकरी धरण्याचा निर्णय घेतला आहे.   अशा वेळी आई त्याला प्रेमाने, अधिकारवाणीने आणि ठामपणे सांगते, "तू असं काही करू नकोस. " तिला असे म्हणायचे असते की पैशाची काळजी करू नकोस, तुझं शिक्षण जास्त महत्त्वाचं. अशा संदर्भात  बर्‍याच वेळा "तू असं काही करणार नाहीस. " हे वाक्य उच्चारले जाते आणि ते मला कृत्रिम वाटते.

एखाद्या ठिकाणी कसे जायचे याकरिता रस्ता सांगताना (मराठीत: 'डिरेक्षन्स देताना') 'तू या रस्त्याने सरळ जा, त्यानंतर अमूक‌अमूक ठिकाणी उजवीकडे वळ, त्यानंतर... ' वगैरेवगैरेंऐवजी माझा नागपुरात वाढलेला एक मित्र 'तू या रस्त्याने सरळ जाशील, त्यानंतर अमूक‌अमूक ठिकाणी उजवीकडे वळशील, त्यानंतर... ' असे सांगत असे. (अजूनही तसेच सांगतो.)

त्यामुळे, अशा वाक्यरचना सर्वत्र कृत्रिम असतीलच, असे सांगता येईलसे वाटत नाही.