तू या रस्त्याने सरळ जाशील, त्यानंतर अमूकअमूक ठिकाणी उजवीकडे वळशील

ह्या वाक्याचा आज्ञार्थाने अर्थ लावताना मला विचित्र वाटायचे; पण एका ठिकाणी चर्चा करताना कळले की हे जाशील, करशील खरे म्हणजे जाशील का? करशील का? अशा अर्थी जाशील? करशील? ह्या रूपांवरून आलेले आहे. म्हणजे पत्ता सांगताना ती व्यक्ती आज्ञार्थाऐवजी अत्यंत विनयपूर्वक "तू असा जाशील का? तिथे वळशील का? " असे काहीसे बोलत असते असा अर्थ घेणे उचित ठरते.