>>अशा संदर्भात  बऱ्याच वेळा "तू असं काही करणार नाहीस. " हे वाक्य उच्चारले जाते आणि ते मला कृत्रिम वाटते.<<
तू असे काही करणार (तर) नाहीस ना? हे कृत्रिम वाटते? बहुधा नसावे.  तसेच संयुक्त वाक्यातला पहिला वाक्यांश जर   "तू असं काही करणार नाहीस. " असा असेल तरी ते कृत्रिम वाटू नये. उदा० तू असे काही करणार नाहीस, अशी माझी खात्री आहे.
आज्ञार्थी वाक्यांत जसा फक्त द्वितीय पुरुष असतो तसा भविष्यकाळातल्या वाक्यांत फक्त प्रथम आणि तृतीय पुरुष असावेत. त्यामुळे मी किंवा ती असे काही करणार नाही, हे कृत्रिम वाटत नाही, पण कर्ता 'तू' करून  वाक्य केले की लगेच कृत्रिम भासते. म्हणजे निष्कर्ष असा की, द्वितीय पुरुषी कर्ता असलेल्या प्रत्येक वर्तमानकाळी वाक्याचे भविष्यकाळात रूपांतर करता येत नाही. शक्य आहे. अधिक उदाहरणांचा अभ्यास करून नियम प्रस्थापित करता यावा.