किती भाषा अवगत आहेत? हा प्रश्न कुठेही विचारला की संस्कृत आपल्याला येते की थोडेफार,.. हे लक्षातसुद्धा येत नाही. खरंतर ८ वी, ९ वी, १० वी संस्कृत भाषा शिकलेली आहे. १०० मार्कांचा पेपर होता. आणि ८० ते ८५ च्या दरम्यान मार्कही मिळवलेले आहेत. आणि श्लोक- स्तोत्रे तर कितीतरी तोंडपाठ आहेत. गीतेचे २/३ तरी अध्याय अजूनही म्हणू शकते. म्हणजे संस्कृत भाषेची ओळख नक्कीच आहे. तरीपण कधी संस्कृत येते हा विचार मनात आला नाही. आता मात्र मनाशी पक्के रुजवले की मला संस्कृत येते असे मी अभिमानाने सांगेन.
तुमच्या लेखाच्या निमित्ताने हा विचार मनात जागा झाला. त्याबद्दल धन्यवाद.