प्रभाकर काका, बालपणाची एक आठवण माझीही..... 

मी पण मार खाल्लेला आठवतो पण आईच्या हातचा व लाटण्याने किंवा झाडूने ! शाळेला दांडी मारून १७ जणांचा ग्रूप सिनेमाला गेला होता त्यात मी पण होतो. शाळेत कशी कोण जाणे कुणकूण लागली - ६ शिक्षकांना घेऊन प्रिंसीपल स्वतः थिएटर वर आले - सगळया दरवाज्यांवर दोन दोन शिक्षकांना ठेवून १७ची १७ पोरं 'रंगेहाथ' पाट्या दप्तरांसकट पकडली गेली..... शाळेतला व घरचा मार आठवला की....... !!!

मालकंस