एम. डी. रामटेके. येथे हे वाचायला मिळाले:
आता शिक्षण संपले. अस्पृश्यांची सेवा हा मुख्य हेतु पण सोबतच अर्थार्जनाची सोय करणेही गरजेचे होते. वकिली व्यवसाय करण्याचे ठरले. पण वकिलीची सनद मिळविण्यासाठी जवळ पैसे नव्हते. पैशाची अडचण आली की नवल भथेना जिंदाबाद. मोर्चा नवलभाईकडे वळला. नेहमीप्रमाणे त्यानी याहीवेळेस पैशाची मदत केली अन एकदाची वकिलीची सनद मिळाली. जुलै १९२३ मधे बाबासाहेबानी वकिलीचा व्यवसाय सुरु केला.मुंबईच्या वरिष्ठ न्यायालयात बॅरिस्टर म्हणुन कामाची सुरुवात केली, पण नेहमी सारखं ईथेही हजार अडचणी उभ्या होत्या. सॉलिसिटरकडुन सहकार्य मिळवुनच कर्तुत्व ...