"कदाचित त्यामुळेच विमादलाल आणि विक्रेते विमायोजनांचा आग्रह ग्राहकांना करत असावेत."   शक्य आहे.

जाहिरातीच्या इंग्रजी तर्जुम्यामध्ये सॉलिसिटेशन हा शब्द आहे की नाही ते मला ठाऊक नाही;   पण जरी असला तरी त्या शब्दासाठी विनवणे, विनवणी, कळकळीची विनवणी, विज्ञप्ती, याचना, याञ्चा, प्रार्थना, अभ्यर्थना,  मिनत, मिनती, मिनतवारी, काकळूत, मनधरणी, गयावया यांपेक्षा काही वेगळे  पर्यायवाची शब्द कोणत्याही इंग्रजी-मराठी कोशात मिळतील असे वाटत नाही. अशा प्रकारच्या विनवणीला फारतर आग्रहाची विनवणी म्हणता येईल, पण नुसता आग्रह नाही.   त्यामुळे मूळ जाहिरात इंग्रजीत असलीच तर तिच्यात वापरलेल्या सॉलिसिटेशन या शब्दासाठी भाषांतरकाराने आधी हिंदीचा(किंवा अन्य भारतीय भाषेचा) कोश पाहून त्यातून मिळालेला शब्द  परत हिंदी-मराठी कोशात पाहिला असावा.   भाषांतराचे भाषांतर केल्यामुळे कदाचित 'आग्रहा'ची प्राप्ती झाली असावी.   याहून वेगळा अंदाज बांधणे मला जमेल असे वाटत नाही. ---अद्वैतुल्लाखान