.. आवडली.
कमलेश,
ही ' समस्यापूर्ती ' नसल्याने इथे बरोबर किंवा चूक असं काही नाही, असं म्हणता येईल.
दिलेल्या द्विपदीतल्या तुम्हाला दिसलेल्या भावाचा प्रवास कसा असावा आणि तो कसा मांडावा,
हा सर्वस्वी तुमचा विचार आहे. आपल्याला खूप भावलेल्या दुसऱ्या कुणाच्याही काव्यात
आपल्याला नेमकं काय आवडलं हे शोधून स्वतःच्या रचनेत ते आहे का , नसल्यास
काय करायला हवं- ह्याबद्दलचा विचारही प्रत्येकाच्या स्वतंत्र प्रवासाचा भाग असावा, असं वाटतं.
तुम्ही उत्तम लिहू शकता हे मला माहित आहे, आणि तुम्हालाही . दरम्यान दुसरा प्रस्तावही
सादर केला आहे, त्यावरून तुम्हाला काय सुचतंय, हे पहायला उत्सुक आहे- त्याकरता शुभेच्छा !