गेले काही दिवस मी जुनी भावगीते शोधून ऐकत आहे. राधे तुझा सैल अंबाडा, वारियाने कुंडल हाले, गगनी उगवला सायंतारा इ. ८० च्या आसपास जन्मलेल्या आम्हाला भावगीते म्हणजे मंगेशकर, दाते, खळे हीच मंडळी ठाऊक.
त्यामुळे वाटवे वगैरे मंडळींची ओळख व्हायला काही वेळ जावा लागला. ही जुनी भावगीते ऐकताना त्या काळातील कोणी या भावगीतांबद्दल लिहिले तर ते वाचायला नक्कीच आवडेल.
मनोगतींपैकी कुणीतरी हे काम करावे अशी विनंती.
संजोप बऱ्याचदा जुन्या हिंदी गाण्यांवर लिहितात. त्याच धर्तीवर मराठी भावगीतांवर वाचायला आवडेल.
- ओंकार.