त्यामुळे, अशा वाक्यरचना सर्वत्र कृत्रिम असतीलच, असे सांगता येईलसे वाटत नाही.
सहमत!
नागपूरकडे 'जाशील, करशील' ही भविष्यकाळी रूपे  'जा, कर' अशी आज्ञार्थी म्हणून(ही) वापरली जातात हे मला माझ्या नागपुरातील मित्रपरिवारामुळे माहीत आहे. पण मी वर जे उदाहरण दिले आहे त्यात केवळ आज्ञार्थ नाही. त्यात प्रेमाने, अधिकारवाणीने आणि ठामपणे असा एक शब्दसमूह आहे. ह्या शब्दसमूहातील  भाव 'यू आर नॉट गोइंग टू डू एनिथिंग लाइक थिस.' ह्यातून नेमका व्यक्त होतो असे मला माझ्या इंग्रजीच्या तुटपुंज्या ज्ञानाच्या आधारावर वाटते. तो भाव त्याचेच शब्दशः भाषांतर  'तू असं काही करणार नाहीस' अशा आज्ञार्थी(?)  वाक्यात येत नाही असे माझे प्रामाणिक मत आहे. ('माझी मनोदेवता मला असे सांगत आहे.'  असा अर्थ घेतला तर तो भाव अजिबातच येत  नाही.)
 मिलिंद फणसे यांनी 'भाषेची प्रकृती' असा छान शब्दप्रयोग केला आहे. माझ्या मते वरील 'वादग्रस्त' वाक्यरचना मी दिलेल्या उदाहरणासारख्या संदर्भात केली तर ती मराठीच्या प्रकृतीला मानवत नाही. दूरचित्रवाणीवर मी अनेकदा ती अशा संदर्भात ऐकली आहे!