मुळात आजकाल लोक लिहितंच नाही. (फक्त वाचतात, तेही ईमेल्स, वर्तमानपत्र, वगैरे). त्यात मराठी लिहिणे कित्येकांना माहितीच नसते. (माझ्या विद्यापीठात मी एकटाच भारतीय भाषा वापरतो). जेव्हा संधी मिळते, तेव्हा आधी धो धो लिहिल्या जाते. मग कळते की अरे आपण काय फालतू लिहिले होते, मग एक तर लिखाण बंद होते किंवा सुधारल्या जाते.

१० कोटी (किंवा जास्त) मराठी लोकांपैकी किती लोक मराठीत लिहितात ?

तेव्हा लिहू द्या...

बाय द वे, इंग्रजीत (किंवा इतर भाषेत) चांगलेच लेख (कविता) असतात असे नव्हे. पण एकदा वापर वाढला की आपोआप लोक "गुणवत्ते"कडे लक्ष देतील.... तोपर्यंत कचऱ्यातून सोने शोधा.  

अवांतर :-एक वाचलेला सुविचार (मूळ इंग्रजीतला आहे) :- कोणत्याही काम करणाऱ्या व्यक्तीची हेटाळणी करू नका, भलेही तो अगदी हळूहळू काम करत असेना. काम करणाऱ्यांवर टिका करणाऱ्यांपेक्षा तो हळू काम करणारा श्रेष्ठच.