अलोक्जी, उदयजी अन बागेश्री,
अतिशय सकारात्मक प्रतिसादाबद्दल धन्यआद. रचनेपेक्षा प्रतिसाद छान अशी माझी परिस्थिती झाली आहे.

मी जेथे जेथे काव्यमैफिलीत ही रचना वाचतो तेंव्हा एक दोन श्रोत्यांच्य डोळ्यात हमखास ओघळ असतात. आपण एवढ्या अस्थेनं प्रतिसाद दिला म्हणून या रचनेची थोडी पार्श्वभूमी नमूद करण्याचे साहस करीत आहे.
मी प्रत्यक्षात एका स्त्रीस गर्भात मुलगी आहे म्हणून गर्भपात करण्यास भाग पाडलेले पाहिले आहे. त्या तरुणीची घालमेल, तिला होणारे मानसिक क्लेश पाहिले आहेत. सासरची मंडळी सोडा, तिच्या आईने पण या क्षणी साथ दिली नव्हती. हा प्रसंग मनावर कायम घर करून गेला आणि खूप दिवसांनी रचनेच्या रुपाने आवतरला. मी पण या रचनेशी खूप बांधला गेलोय.