या उपक्रमास मनापासून शुभेच्छा! यात सहभाग घ्यायला आवडेल. माझा प्रयत्न खाली देत आहे. आपण दिलेल्या स्वातंत्र्यामुळे काही बदल केले.
=====================================

प्रश्न नाही 'किती सोबती लाभले' 
प्रश्न आहे किती आपले त्यातले

मी मला भेटल्यापासुनी वाटते
एकटे एकटे राहणे चांगले

कोण येणार शाबासकी द्यायला?
वाट नाही तिथे बंगले बांधले

बायको सावलीसारखी राहिली
एकमेकांत नाही कुणी नांदले

त्रास माझ्यामुळे होत होता मला
संपताना मला चांगले वाटले

धन्यवाद! 

-'बेफिकीर'!