वाद असतो, विवाद होतो, वादविवाद रंगतो, संवाद घडतो, चित्रपटात संवाद लिहितात, विसंवाद विकोपाला जातो, छळवाद मांडतात, तर, आशीर्वाद/धन्यवाद देतात आणि स्वीकारतात. आशीर्वाद मानतासुद्धा येतो. 'आपण दिलेली ही वस्तू आपला आशीर्वाद मानून/समजून मी स्वीकारते,' असे म्हणता येते. सर्वांकडून धन्यवाद स्वीकारता येतात, सर्वांचे आशीर्वाद घेता येतात, मग सर्वांचे धन्यवाद का नाही? आणि जी वस्तू घेता येते ती देतापण येते. फक्त देताना ज्याला द्यायची त्याची चतुर्थी, म्हणून  सर्वांना धन्यवाद दिले हे बरोबर.  तरीदेखील आभार, उपकार, ऋण, हार जसे मानतात तसेच सर्वांचे धन्यवाद मानणे फारसे चूक नसावे.