'वारियाने कुंडल हाले' ही गौळण आहे, भावगीत नाही.
दुसरे असे की, कसा गं बाई झाला हे गजानन वाटव्यांनी गायलेले गीत पहिले ध्वनिमुद्रित भावगीत असेल हे पटत नाही. 
जी. एन, जोशी हे मराठीतले आद्य भावगीतगायक. वाटव्यांच्या आधीचे. ते एच्‌एम्‌व्ही या फोनोच्या तबकड्या बनवणाऱ्या कंपनीत होते.  त्यामुळे त्यांनी गायलेले 'नदी किनारी, नदि‌ किनारी' हे पहिले ध्वनिमुद्रित भावगीत असावे.