विनीलची कहाणी आणि सचिनचे पत्र मराठी जालस्थळांवर आणल्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद. सरकारी यंत्रणेचे वाभाडे  काढणारे लिखाण अहमहमिकेने प्रसिद्ध होत असताना आणि त्याला भरभरून प्रतिसाद मिळत असताना यंत्रणेतल्या एका छोट्याश्या दुव्याची थोरवी सांगणे हे कदाचित प्रो-एस्टाब्लिश्मेंट ठरू शकले असते. अर्थात विनीलचे यश आणि कर्तृत्व हे त्याचे वैयक्तिक आहे, सरकारचे नाही हे खरे. पण सरकार म्हणजेसुद्धा कोणती एखादी काँक्रीट दृश्यमान वस्तू नाही. ती एक महाकाय पाषाणही नाही.ती हलू शकते, द्रवू शकते.तिच्यामध्ये प्राण भरण्याचे, तिला जिवंतपणा आणण्याचे काम विनीलसारखे  घटक  करतात. शिवाय विनील ज्या समाजाचा घटक आहे, त्या समाजाचीही म्हणजे पर्यायाने आपली सर्वांचीच ती जबाबदारी आहे. एखादा विनील पुढे सरतो आणि आम्ही मात्र हात पाठीमागे बांधून तमाशा पाहतो.

विनील, तू पुढे सर.

आम्ही आहोतच मागे: आदिवासींच्या जमिनी लाटत, त्यांची अनुदाने ढापत,त्यांची लुबाडणूक करत, त्यांना गावकुसाबाहेर, इतकेच नव्हे तर वर्णाश्रमधर्माबाहेर ठेवत आम्ही आहोतच आपापल्या जागी तुझी दुर्मीळ सक्सेस स्टोरी चघळत.

ता. क.; विनीलची सुटका झाली . आता तो स्वतःच्या अपहरणापासून धडा घेऊन अधिक परिपक्वतेने कामास भिडो.