एकदा एकटी भेटली, थांबली- गोडसे हासली
अंगणी चांदणे सांडले - झोपडे लाजले रे किती !

रोज मी तोच तो चेहरा पाहतो, सांगतो रे कुणा-
भावले ना मला फारसे, आरसे चाळले रे किती..


( पहिली द्विपदी अशीही  लिहून पाहिली :

एकदा एकटी भेटली, थांबली - थांबले श्वासही.. 
मोजके हासली , त्यातही अर्थ मी माळले रे किती ! )