एम. डी. रामटेके. येथे हे वाचायला मिळाले:
आता बहिष्कृत हितकारिनी सभा जोमाने कामाला लागली. सगळे कार्यकर्ते उत्साहाने समाज कार्यांत गुंतुन गेली. जाने-१९२५ ला सोलापुरात ब.हि.स. चे पहिले वहिले वसतीगृह चालु झाले. जीवप्पा सुभाना कांबळी हे या वसतीगृहाचे पर्यविक्षक म्हणुन नेमण्यात आले. आता सोलापुरच जिल्ह्यातिल बहिष्कृत मुलांचा अंशता का होईना पण शिक्षणाचा प्रश्न सुटला होता. सरस्वती विलास:याच दरम्यान ब. हि. स. नी एक मासिक काढलं, त्या मासिकाचं नाव होतं “सरस्वती विलास” या वेळेस बाबासाहेब हिंदु होते. ते स्वत:ला हिंदु मानत. त्यांचा विरोध जातियवादाला होता. आजुन ...