तुम्ही सारा अनुभव रंजक लिहीला आहे. वाचताना खूपच मजा आली. एक एक उपमा, शब्दप्रयोग धमाल आहेत.

हे जे काही वर्णन लिहिलेले आहे ते खरंच असं चित्र असतं का हो आर. टी. ओ ऑफिसमधलं? प्रचंड गदारोळ... या दिव्यातून आपलं काम करून आणणं म्हणजे विजयश्री मिळवण्यासारखंच आहे हो.

मी भारतात असताना माझ्याकडे दुचाकी वाहनाचा परवाना नव्हताच. त्यामुळे आर. टी. ओ ची पायरी चढली मव्हती. चारचाकी शिकण्यासाठी प्रशिक्षण घेत होते. त्याचे ८ धडे अजून बाकी असतानाच मी अमेरिकेला आले. त्यामुळे त्याचा परवाना अजून हातात पडला नव्हता. मी अमेरिकेत आल्यावर कुरिअरने माझा परवाना मला मिळाला. गाडी चालवून दाखवणे वगैरे काही परीक्षा दिलीच नाही. हे अयोग्य आहे हे खूप दिवस खुपले हो!!!! पण आज तुमचा अनुभव वाचून वाचलो आपण या दिव्यातून असं वाटतयं.

इकडे आल्यानंतर इकडचा परवाना मिळवण्याचा  अनुभव मात्र मिळाला. पण तो वाईट नक्कीच नव्हता. आणि ईकडे मात्र रीतसर परीक्षा देऊन परवाना मिळवला आहे आणि सर्रास चारचाकी चालवते.