अंगाईगीत, अभंग,  ओवी, आरती, उत्सवगीत, कटाव, कथागीत, कवाली, कोळीगीत, क्रीडागीत, गझल, गवळण, गोंधळ्याची गाणी, चित्रपटगीते, चौपाई, जप, ठुमरी, देवें, दोहा, धांवा, नाट्यगीत, नामगजर, नावाडीगीते, पाळणा, पाळणागीत, पोवाडा, फटका, बडबडगीत, बाऊलगीते, भजन, भक्तिगीत, भारूड, भावगीत, भूपाळी, भोंडल्याची गाणी, मंगळागौरीची गाणी, मंत्र,  रवींद्रसंगीत, राष्ट्रगीते,  वाद्यसंगीत, वासुदेवाची गाणी, विरहिणी, श्रमगीत, श्लोक, संघगीत, संचलनगीत, समरगीत, सूफीसंगीत, स्फूर्तिगीते, स्त्रीगीते, लग्नगीते, लावणी, लोकगीते, हादग्याची गाणी हे सर्व ऐकताना एखाद्याला, आस्वादाच्या दृष्टीने फारसा फरक वाटणार नाही. याचा अर्थ हे सर्व गायनप्रकार एक आहेत असे नाही.  या प्रत्येक गायनाच्या प्रकारासाठी वेगळ्या चाली, वेगळी वाद्ये, वेगळे गायक, वेगळे प्रसंग आणि वेगळी व्यासपीठे असतात. भावगीताची तुलना फक्त गझलेशी होऊ शकते, गवळणीशी नाही.