आरतीस्तव नीरांजने ताम्हणी लावती रोजची
कोणत्या मंदिरी देव झोपेतुनी जागती नी किती?

पापा झाकावया दान देती पुण्याचे घडे मोजती
कोणता स्वर्ग त्यांना मिळाला पुराणे धुंडावी किती?

जेवणे झोपणे मैथुती झिंगणे सौख्य ते गर्जती
माणसाचे जिणे येथले भोगती कोण नी किती?

वाहती कालवे बेगड्या भावनांचे रोजची
आंगणी आसवांच्या हर्ष वाटती मैफिली त्या किती?

शेवटी प्रश्न हा की इथे सोबती लाभले रे किती?
एवढे भेटले बोलले त्यातले आपले रे किती?

... हुश्श ! प्रयत्न केलाय् खरा, पण...?