लेखी भाषा ही जास्त नियमबद्ध असते. बोली भाषेत खूप जास्त बदल होतात हे सगळ्या भाषांत दिसते. मराठीतही तेच व्हावे. इंग्रजीचे उदाहरण द्यायचे तर ऑस्ट्रेलियन माणूस टुडे ला टुडाय् म्हणतो पण म्हणून ऑस्ट्रेलियात today च्या ऐवजी todie किंवा तत्सम काहीबाही लिहीत नाहीत. अमेरिकेतही अनेक भागात शब्दांचे वेगवेगळे उच्चार होतात पण लेखी एकच नियम वापरला जातो. काही वेळा वातावरण निर्मितीकरता लेखक बोलतात तसे स्पेलिंग करतात पण तो अपवाद नियम नव्हे.
   कुठल्याही भाषेचे नियम गुरुत्त्वाकर्षणाच्या नियमाइतके अबाधित नसतात. मग मराठीचे कसे असतील? पण ते पन्नास वर्षांनी बदलणार आहेत म्हणून नियमच नको हे म्हणणे चूक. त्याने अंदाधुंद होईल.
लेखी भाषा हे जास्त काटेकोर असते आणि ती तशीच रहावी. बोलीभाषेइतकी ती ढिली बनू नये अशी माझी इच्छा आहे.