मनोगतवर, पाककृतीसदरातील, आणखीवर क्लिक केल्यास, आधीच्या पाककृतींची यादी येते. पण, रंगलेल्या चर्चा, सदरातील आणखीवर क्लिक केल्यास मात्र, तसे होत नाही. तेथे क्लिक केल्यास, आधीच्या चर्चांची यादी मिळावी, त्यावरील प्रतिसादांवरून sort केलेली, तारखेवरून नाही. त्यावर तारखेने sort करण्याचीही व्यवस्था असवी असे वाटते.

शक्य असल्यास चर्चा सदरातील दोन चर्चांच्या नावांमध्ये अधिक अंतर असावे. काही दिवसांपूर्वी, पाऊस ह्या विषयावर, आणी, मला भेटलेले सामाजिक नकार असे दोन चर्चेचे प्रस्ताव एका खाली एक होते. ते मी नेहमीच ... पाऊस ह्या विषयावर मला भेटलेले सामाजिक नकार असे चुकून वाचायचो.

ह्याव्यतिरिक्त, कविता आणि लेख ह्यामध्येही फरक करता यावा. पुस्तके, पाककृती, निवडक लेख बरोबरचं कविता हे सदर असावे.

नवीन मदत हे सदरही सुरू करावे, त्यात नवीन आलेल्यांना, मनोगतबद्दल माहिती. लेख कसे संपादित करावे, शुद्धलेखन चिकित्सा कशी वापरावी, html  कसे वापरावे, चित्रे कशी काय दाखवावीत, ह्याबद्दल माहिती द्यावी.

मराठीतून रोमनमध्ये जाताना, ctr + t दाबावे लागते, त्याऐवजी ctr + इतर कुठलेही बटण नाहीका चालणार ? कारण, T हे R च्या बाजूला असून, चुकून ctr + r केल्याने पेज रिफ़्रेश होते व लिहिलेला सर्व मजकूर निघून जातो.

Typing help च्या खिडकीची लांबी रुंदी वाढविणे शक्य आहे का ? जेणे करून scroll bar ची गरज लागणार नाही.

गेले २-३ दिवर शुद्धलेखन चिकित्सकही नीट चालत नाहिये.

मयुरेश वैद्य.