लताताईंच्या शब्दाशब्दाशी सहमत.

... पण हे केवळ निदान करण्यापुरते होऊ नये. तर ह्यावर उपाय शोधण्याचेही प्रयत्न व्हायला पाहिजेत, नाही का?

उदा.

बहुसंख्य मराठी माणसे जर धनवान होतील तर बाजारात त्यांची पत वाढेल आणि त्यांच्याशी व्यवहार करताना अन्य लोक आपोआपच मराठीतून तो करू लागतील.

जे मराठी भाषक धनवान आणि प्रतिष्ठित आहेत त्यांनीच उत्तम मराठीत सार्वजनिक व्यवहार करणे सुरू केले तर इतर लोकांना त्यांचा कित्ता गिरवावासा वाटेल. असे मला वाटते.