आदरणीय सतीशजी,

आपल्या उपक्रमात मा झा पहिला सहभाग ! खेड्यात बालपण गेलेल्या माणसाचे भाव चितारण्याचा पप्रयत्न केला आहे. कसा वाटला हे ई मेलने कळअणे. धन्यवाद.
  
                      पुन्हा नव्याने जुन्याच जागी


पुन्हा नव्याने जुन्याच जागी तसेच सारे जमूत मित्रा
लहानपणच्या यथेच्छ गप्पा पुन्हा जरा आठवूत मित्रा

पहाट होता सुरेल ओव्या पडून कानी सुखावलो मी
दळावयाला कुठेय जाते ? प्रदर्शनी ते बघूत मित्रा

पिकात सळसळ फुलात दरवळ नदीत खळखळ दिसे न आता
लहानपणचा वसंत हिरवा कवेत थोडा धरूत मित्रा

उगाच आपण तिला चिडवता उदास होई "शकू" बिचारी
रुसून लटके अबोल होणे स्मरून खळखळ हसूत मित्रा

जलाशयी त्या असंख्य आठव तुडुंब भरले अजून ताजे
बसून काठी खड्यास टाकून तरंग उठता रडूत मित्रा

चटावलेल्या जिवास शहरी उजेड झगमग हवाहवासा
पहावया काजवे चमकते लहान गावी विझूत मित्रा

उतावळा तू मनात इतका कशास "निशिकांत" भेटण्याला ?
कुणास ठावे उद्यास कोठे असूत किंवा नसूत मित्रा

निशिकांत देशपांडे मो.नं. :-- ९८९०७ ९९०२३
E Mail :- दुवा क्र. १
प्रतिसादाची अपेक्षा