एम. डी. रामटेके. येथे हे वाचायला मिळाले:
जुन १९२७ मंदिर प्रवेशाचा विचार विनिमय सुरु झाला. पेपर मधुन तशा बातम्या सोडण्यात आल्या. त्यामुळे लोकांचा एकंदरी कल काय आहे तो आजमावण्याचा हा डाव होता. बाबासाहेबानी लवकरच मंदिर प्रवेशाची चळवळ हाती घेण्याचे जाहिर करताच सनातन्यानी सडकुन टिका चालु केली. आता तर धमक्याही येऊ लागल्या. अस्पृश्यानी नसले उद्योग करु नये अन्यथा त्याना धडा शिकविण्यात येईल अशी सर्वत्र चर्चा चालु झाली. बाबासाहेबाना जे हवं होतं ते मिळालं. सनातन्यांचा रोख काय आहे याचा त्याना अचुक अंदाज आला. आता त्या अनुषंगाने तेवढाच सशक्त लढा उभारणे ...