कारकून महोदय,
आपली रोजनिशी वाचायला आवडू लागले आहे. पण हिला रोजनिशी म्हणायचे का? आपले हे लिखाण मानवी जीवनावर नकळत भाष्य करू लागते. हे ना रहात मनोगत; ना रहात रोजनिशी!

तिच्यापेक्षा तोच हरकायचा.
हरकायचा की हरखायचा(?!). जमले तर तज्ञांनी शब्द सुचवावा.

सर्वांत महत्वाचे म्हणजे आपल्या रोजनिशीतील "तो" रोजनिशीचे पान फाडून का टाकतो?
शांतपणे झोपून आयुष्याला नवी दिशा मिळावी म्हणून का?