माझ्या मेते भाषी आणि भाषक हे दोन्ही शब्द हिंदी आहेत व हिंदीत वापरले जातात. भाषिक हा शब्द फार पूर्वी पासून
वापरात आहे. माझ्या वाचनातही भाषिक हाच शब्द आहे. पण सतत वापरल्यामुळे भाषी आणि भाषक हे शब्द मराठी वाटतात.
असे बरेच शब्द व वाक्यरचना हिंदीतून चक्क भाषांतरित करून दूरदर्शन मालिका वृत्तपत्रे यात वापरले जात असल्याने मूळ
मराठी शब्द अस्तंगत होत चाललेले आहेत. सध्या मी मूळ मराठी शब्द व वापरात असलेलेपर्यायी भाषांतरित हिंदी शब्द अशी
सूची करण्याचं काम करीत आहे.