व्यासपिठ आणि विद्यापिठ या शब्दांची सध्या चलती आहे. आमच्या भागात दरवर्षी एक  साहित्यसंमेलनसदृश कार्यक्रम होतो. त्या कार्यक्रमातील जवळजवळ प्रत्येक वक्ता व्यासपीठावर बसून वायफळ शब्दांचे पीठ दळतो आणि बाकीचे त्या आयत्या पिठावर रेघोट्या ओढतात.  विद्यापीठ म्हणजे विद्येचे पीठ दळण्याची जागा असाच बहुधा आजच्या राजकारणी लोकांचा समज असल्याने   ते निरपवादरीत्या विद्यापिठ म्हणतात.
पण लेख खरोखरच फार छान आहे. त्या निमित्ताने दिलेल्या दुव्यावर एका पहिलीतल्या मुलीचा  निबंध वाचायला मिळाला, हेही नसे थोडके.  'मुक्तपिठा'ला धन्यवाद.