हे लघुनिबंध/ ललित/लेख या सदरात मोडणारे लिखाण आहे असे मला वाटते. ह्या लेखात कारकूनाच्या आयुष्यात घडलेल्या घटना आहेत. रोजनिशी या शब्दाचा अर्थ त्या त्या दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा एवढाच मला वाटतो. त्याचा मागोवा घेताना कारकूनाच्या मनातील विचारांचे काहूर, त्या घटना वर पर्यायाने उजाळा देणाऱ्या dependant गोष्टी यावर नकळत भाष्य होईलच असे वाटते. कारकून हा सर्वसामान्य माणसाचा प्रतिनिधी आहे. तो कोणतेही कनफेशन करण्यासाठी लिहीतो आहे असे नाही.  पण त्याला नुसत्या घटना उतरवायच्या नसून त्याला कारणमीमांसा सुद्धा करायची आहे. त्यामुळे त्याची रोजनिशी अगदी १,२,३ ह्या क्रमाने घटनांची फक्त नोंद घेते असे नाही. introspection असे काहीसे म्हणता येईल असे वाटते. सामान्य माणसाच्या त्याच्याच जीवनाकडे वळून पाहून त्यावर भाष्य करण्याचा हा प्रकार. त्याच्या मनाची आंदोलने ही रोजनिशी पकडते.

तिच्यापेक्षा तोच हरकायचा.
हरकायचा की हरखायचा(?!). जमले तर तज्ञांनी शब्द सुचवावा.

हे तज्ञांना विचारावे लागेल, मी चिकीत्सक वापरला नाही. हरखणे असे क्रियापद असेल तर आपण बरोबर आहात. इतर तज्ञांची गरज मला वाटत नाही.लिखाणातील चूक दर्शवल्याबद्द्ल धन्यवाद.

सर्वांत महत्वाचे म्हणजे आपल्या रोजनिशीतील "तो" रोजनिशीचे पान फाडून का टाकतो?
शांतपणे झोपून आयुष्याला नवी दिशा मिळावी म्हणून का?

तो ते पान फाडून टाकतो कारण इतर कोणाच्या हाती ते लागू नये. त्या फाडण्या आणि जाळण्यामागे त्याच्या मनातील विध्वंसक वृत्तीला तो वाट करून देतो आहे.. पुढील दिवसाच्या सकारात्कम आणि constructive  वागणूकीसाठी.  म्हणून ते पान फाडणे व जाळणे ह्या कृतींकडे असे प्रतिकात्मक दृष्टीने पहावे. रोजनिशीत आजवर कविता आली, उद्या एखादा सिद्धांत येईल, परवा एखाद्या खेळाची माहिती येईल.. अर्थात त्याची आठवण कारकुनाला कोणती तरी घटना करून देते म्हणून.

कळावे,