वरील गीतप्रकारांमध्ये आणखी थोडीशी भर. तमाशा सुरू होतानाचे गणेश वंदन(उदा० आऽधीऽ नमन तुला गणराया, किंवा गणपती आला अन नाचून ग्येला), नांदी(उदा० संगीत शाकुंतलची--वकतुंड नररुंडमालधर' किंवा, जय जय गौरीशंकरची--'सप्तसूर झंकारित बोले') , धवले(लग्नात किंवा राज्याभिषेक समारंभात गायची गीते__ही दक्षिणी भारतात, गुजराथेत आणि महाराष्ट्राच्या आदिवासी भागात अजूनही गायली जातात), आणि छक्कड(उदा० संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या चळवळीतले, अण्णा भाऊ साठेलिखित 'माझी म्मैना गावावर राह्यली, माझ्या जिवाची होतीया क्काहिली') .
संतकाव्यातील गवळण आता इतिहासजमा झाली असली तरी तमाशातली गण-गौळण-वग या त्रिसूत्रीतली शृंगारिक गौळण अजून जिवंत आहे. त्या गौळणीच्या जागी भावगीत चालत नाही, आस्वादाच्या दृष्टीने तसेच वाटले तरी!---अद्वैतुल्लाखान