'नवीन मराठी संगीताच्या इंटरनेटवरील प्रभावी प्रसारासाठी' म्हणजे नेमक्या कोणत्या संगीतासाठी?  'कोंबडी पळाली तंगडी धरून'  किंवा 'कढईतले कांदेपोहे' असल्या संगीतासाठी? जे संगीत पुढील पाचदहा वर्षात लोक विसरून जाणार आहेत त्याचा प्रसार कशाला करायचा?  कुठल्याही म्युझिक संकेतस्थळावर गेले तर अद्ययावत मराठी एम्‌पीथ्री संगीत हवे तितके मिळते.  तिथे अभिजात संगीत का मिळू नये?