नवीन मराठी संगीत म्हणजे कोंबडी पळाली तंगडी धरून' किंवा 'कढईतले कांदेपोहे' इतकच दुर्दैवाने सर्वसामान्य लोकांना माहीत आहे!
पण याव्यतिरीक्त "बरचसं" दर्जेदार संगीत निर्माण होत असतं जे पुरेशा मार्केटींगच्या अभावी मराठी रसिकांपर्यंत पोहोचतच नाही! हे कुठेतरी बदललं पाहिजे म्हणून मानबिंदू हे संकेतस्थळ आपल्यातर्फे शक्य तितके प्रयत्न आजमितीस करत आलं आहे! मराठी संगीताच्या फेसबुकवरील प्रसारासाठी मानबिंदून तयार केलेल
मराठी संगीत फेसबुक ऍप्लीकेशन हे त्यातलं पहिलं पाऊल होतं आणि आता ब्लॉग्स आणि इतर संकेतस्थळावर प्रसार करण्यासाठी
मानबिंदू म्युझिक शॉपी हा महत्त्वकांक्षी प्रकल्प हे दुसरं पाऊल आहे! मानबिंदूच्या संगीत विभागाला भेट देऊन
स्पंदन,
गंध हलके हलके यासारखे नवीन मराठी अल्बम्स नजरेखालून घातले असते तर कुठलं संगीत याचं उत्तर तुम्हाला आपसूक मिळाल असतं असही वाटते! :)